भारतात या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक पगार मिळतो!
ऑईल अँड नॅच्युरल गॅस सेक्टर प्रोफेशनल्स : या क्षेत्रात सर्वाधिक फायदा आहे. यामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ आणि मरिन इंजिनीअर्स यांचा यामध्ये समावेश आहे. अनुभव असल्यास वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. शिवाय इतर फायदेही मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमार्केटिंग : हे एक कलेचं क्षेत्र आहे. तुम्ही तुमची वस्तू किती चांगल्या पद्धतीने विकू शकता, त्यावर तुमचा पगार ठरतो. सुरुवातीला वार्षिक पगार दोन लाख रुपयांपासून सुरु होतो, मात्र अनुभवानुसार हा आकडा 20 लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
मॅनेजमेंट प्रोफेशनल्स : कंपनीतील टास्कचं मॅनेजमेंट करणं हे यांचं काम असतं. मॅनेजमेंट प्रोफेशनल्स कंपनीतील मुख्य घटक असतात. चांगला अनुभव असेल, तर लाखांमध्ये पगार मिळतो. यामध्ये सुरुवातीला वार्षिक वेतन तीन लाख रुपये, मध्यम स्तरावर 25 लाख रुपये आणि चांगला अनुभव असेल तर 80 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
चांगलं वेतन मिळणारी नोकरी कुणाला नको असते? प्रत्येक जण चांगल्या नोकरीच्या शोधातच असतो. अशा काही नोकऱ्या आहेत, जिथे लाखांमध्ये पगार मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
हे सर्व संशोधनातील दावे आहेत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. तुम्ही कोणत्याही सल्ल्यावर अंमलबजावणी करण्याअगोदर तुमच्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. (फोटो : गुगल फ्री इमेज)
इन्वेस्टमेंट बँकर्स : हे केवळ बँकांना आर्थिक सल्लाच देत नाहीत, तर कंपनीसाठीही खुप कमाई करतात. यांना मनी मॅन असं म्हटलं जातं. सुरुवातीला वार्षिक पॅकेज 12 लाख, मध्यम स्तरावर 30 लाख आणि चांगला अनुभव असल्यास 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेज आहे. (फोटो : गुगल फ्री इमेज)
मेडिकल प्रोफेशनल्स : हे असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये मंदी कधीही येत नाही. शिवाय पगार नेहमी वाढतच राहतो. सुरुवातीला वार्षिक पगार पाच लाख रुपये असतो. मात्र अनुभवानुसार हा पगार लाखांमध्येच वाढत राहतो. याव्यतिरिक्त स्वतःचं क्लिनिक असल्यास हा आकडा आणखी वाढतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
चार्टर्ड अकाऊंटंट : सीए नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या लोकांच्या हातात कंपनीच्या सर्व आर्थिक नाड्या असतात. भारतातील हा एक महत्त्वाचा जॉब मानला जातो. यांचं वार्षिक पॅकेज 5 ते 6 लाख, मध्यम स्तरावर 12 ते 13 लाख आणि चांगला अनुभव असल्यास 25 ते 26 लाख रुपये एवढं असतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
बिझनेस अॅनालिसिस्ट : भारतात इतर क्षेत्रांप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे कंपन्या अशा लोकांना हायर करतात, ज्यांचा आयक्यू हाय असेल आणि ते लॉजिकल माईंड असतील. या जॉबसाठी गणित चांगलं असणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक क्षणाला अपडेट राहणं आणि नवीन तंत्रज्ञान समजून घेणं यांच्यासाठी मोठं आव्हान असतं. सुरुवातीला वार्षिक पगार पाच ते सहा लाख रुपये मिळतो, मात्र एकदा चांगला अनुभव आला, की 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -