सर्वाधिक कमाई करणारे टॉप-100 खेळाडू, कोहली कितवा?
कोहली सातत्याने नवनवे विक्रम नोंदवत आहे. आपल्या सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीमुळे कोहली 2015 साली टीम इंडियाचा कर्णधार बनला.
फोर्ब्स मॅगझिनच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी टीम इंडियाकडून कोहलीला पगार आणि सामना मानधन म्हणून 10 लाख डॉलर मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून 23 लाख डॉलर पगार कोहलीला मिळतो. आयपीएलमध्ये सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक कोहली आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील टॉप-100 खेळाडूंची यादी फोर्ब्स मॅगझिनने प्रसिद्ध केली आहे. या यादीत भारतातील एकमेव खेळाडू आहे, तो म्हणजे विराट कोहली.
सर्वात जास्त कमाई करणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत विराट कोहली 89 व्या स्थानावर आहे. विराटची एकूण कमाई 2 कोटी 20 लाख डॉलर आहे. यामध्ये 30 लाख डॉलर त्याचा पगार आणि पुरस्कार, तर इतर 1 कोटी 90 लाख डॉलरची कमाई जाहिरातींच्या माध्यमातून होते.
टेनिस स्टार सेरेन विलियम्स 2 कोटी 70 लाख रुपयांच्या कमाईसोबत या यादीत 51 व्या स्थानावर आहे.
कोहलीचं कौतुक करताना फोर्ब्सने म्हटलंय की, या सुपरस्टारची तुलना चांगल्या गोष्टींमुळे आतापासूनच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत होऊ लागली आहे.
सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल असणाऱ्या रोनाल्डोची एकूण 9 कोटी 30 लाख डॉलर कमाई आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो आहे.
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनल मेस्सी 8 कोटी डॉलरच्या कमाईसोबत तिसऱ्या स्थानावर आहे.
टेनिस स्टार रॉजर फेडरर 6 कोटी 40 लाख डॉलरच्या कमाईसह चौथ्या स्थानावर आहे.
अमेरिकेतील बास्केटबॉल स्टार लिब्रोन जेम्स 8 कोटी 62 लाख डॉलर कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे.