रवी शास्त्रींसह सपोर्ट स्टाफला किती मानधन मिळणार?
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2017 09:51 AM (IST)
1
रवी शास्त्रींच्या सपोर्ट स्टाफला बरंच वेतन मिळणार आहे. सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना दोन ते तीन कोटींपर्यंत मानधन मिळण्याची शक्यता आहे.
2
म्हणजेच टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंपेक्षा जवळजवळ एक ते दीड कोटी रुपये अधिक मानधन शास्त्रींना मिळणार आहे. कुंबळेला साडेसहा कोटी मानधन मिळत होतं
3
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना वार्षिक मानधन आठ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती बासीसीआयमधील सुत्रांकडून समजते आहे.
4
भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण यांची नियुक्ती झाल्यानंतर आता रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफचा नेमका पगार किती याची चर्चा सुरु झाली आहे.