जिओ टीव्ही, जिओ गीगा फायबर; रिलायन्सच्या महत्त्वाच्या घोषणा
याशिवाय माय जिओ अॅपद्वारे तुम्ही तुमच्या घराची सुरक्षाही करु शकता. या अॅपमध्ये सिक्युरिटी फीचर्सही मिळतील, जे माय जिओ अॅपद्वारे अॅक्सेस करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिओ अॅप लॉन्च, घरातील फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणं जिओ अॅपद्वारे चालतील. टीव्ही, कॅमेरा, प्लग्ज दरवाजे इत्यादी आवाजानेच कंट्रोल होणार
आता जिओ सेट टॉप बॉक्सही मिळणार. याद्वारे युझर्सना 600 पेक्षा जास्त चॅनल्स आणि लाखो गाणी उपलब्ध होणार आहेत. जिओ फायबर युझर्स टीव्हीद्वारेही कॉलिंग करु शकता.
गीगा टीव्ही सेट टॉप बॉक्समध्ये बहुतांश सर्व भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांडची सुविधा असेल. 4K रिझॉल्युशनचा हा सेट टॉप बॉक्स असेल.
15 ऑगस्टपासून युझर्स गीगा फायबरसाठी नोंदणी करु शकतात. ज्या क्षेत्रात जास्त नोंदणी होईल, त्यांना कनेक्शन देण्यात प्राधान्य दिलं जाईल.
जिओ फोन 2 लॉन्च, 2,99 रुपयात 15 ऑगस्टपासून फोन उपलब्ध होणार. फोनमध्ये यू ट्यूब, व्हॉट्सअॅप, फेसबुक अॅप असणार.
मान्सून हंगामा ऑफर अंतर्गत तुम्ही 501 रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन 2 खरेदी करु शकता.
1001 शहरांसाठी जिओ गीगा फायबर लॉन्च होणार. 1.1TB (terabytes) फ्री डेटा 100 mbps स्पीड मिळणार
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 41 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. रिलायन्स जिओने आता टीव्हीही (Jio GIGA TV ) लाँच केला आहे. तसंच जिओचा नवा फोनही भेटीला येणार आहे.
2018 हे आर्थिक वर्ष रिलायन्स उद्योग समुहासाठी खास असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा 20.6 % वाढून 36,076 कोटी रुपयांवर पोहोचल्याचं ते म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -