सलगच्या सुट्ट्यांमुळे महामार्गांवर ट्रॅफिक जॅम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवार-रविवार आणि त्याला जोडून आलेल्या स्वातंत्र्यदिन यामुळे सलग सुट्ट्या आहेत. त्यामुळे नोकरदार तसेच विद्यार्थी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मुंबईबाहेर पडले आहेत.
सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. खंडाळा घाटाजवळ वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली असून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
फाईल फोटो
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेपाठोपाठ मुंबई-नाशिक हायवेवरही ट्राफिक रेंगाळलं आहे. सलगच्या सुट्ट्यामुळे मुंबईच्या बाहेर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची संख्या वाढली आहे.
मुंबई-पुणे महामार्ग ठप्प झालेला असताना तिकडे सातारा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खेड-शिवापूर टोलनाक्यावर ही वाहतूक कोंडी झाली आहे. गाड्या अगदी कासव गतीने पुढे सरकत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -