परशासाठी चाहते सैराट, पोलिस बंदोबस्तात नव्या सिनेमाचं शूटिंग
मात्र सेन्सॉर बोर्डासाठी या सिनेमाचं नाव 'फन अनलिमिटेड' आहे. आम्हाला वाद नकोय, असं मांजरेकर उपहासाने म्हणाले.
'FU' हा तरुणाईचा चित्रपट असल्याचं महेश मांजरेकर सांगतात. सिनेमाच्या नावातच सर्वकाही आहे. याच्या इनिशियल्समधून त्याचा अर्थ उघड होतो.
मात्र आकाश जिथे जातो, तिथे त्याची एक झलक पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची अलोट गर्दी लोटते. त्यामुळे आकाशसोबत शूटिंग करणं अतिशय अडचणीचं बनल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे.
'FU' च्या सेटवर आकाश आहे, याची कुणकुण लागू नये, याचा सर्वतोपरी प्रयत्न सिनेमाची टीम करत आहे.
त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु आहे. परंतु चाहत्यांच्या गर्दीमुळे आकाशला प्रचंड पोलिस बंदोबस्तात राहावं लागत आहे.
महेश मांजरेकर यांच्या 'FU' या आगामी सिनेमात आकाश ठोसर काम करत आहे.
मात्र याचा फटका त्यांच्या खासगी आयुष्यालाही बसत आहे. आकाशच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगवर याचा परिणाम जाणवत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटामुळे आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु रातोरात स्टार बनले. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अक्षरश: वेडे होतात.