नांदेडमध्ये ढगफुटी, नद्या-नाले फुल, लातूर, उस्मानाबादमध्ये विक्रमी पाऊस
वास्तविक एवढं पर्जन्यमान कोकणात असतं. या पावसामुळे पिकांचा मोठं नुकसान झालं आहे. या गावाला जाणाऱ्या एका छोट्या पुलाच्या दोन फुटांवरुन पाणी जात असल्याने गावात जाणं कठीण झालं आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेवाडी गावात ढगफुटी झाली आहे. जिल्ह्यात तब्बल 221 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
उस्मानाबादच्या त्रिकोळी गावात अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. तर मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेला आहे.
याशिवाय साकोळ ,पांढरवाडी, घरणी हे तिन्ही प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. या प्रकल्पाखाली येणाऱ्या दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उस्मानाबादच्या बेट जवळगा गावात बोअरवेलमधून चक्क आपोआप पाणी येत आहे.
लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह धुँवाधार पाऊस सुरु आहे. लातुरातील मांजरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उमरगा-लातूर मार्गावरही पाणीच पाणी झालं आहे.
उस्मानबाद, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्यांच्या बहुतेक तालुक्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
उस्मानाबाद : अनेक दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने मराठवाड्यात दमदार पुनरागमन केलं आहे. उस्मानाबाद, लातूर, नांदेडसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.