नाशिक, कोकणात, मुसळधार, दुतोंड्या मारुती यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली
कोकणात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरी शहर आणि ग्रामीण तसेच चिपळूण आणि खेड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे.
पावसामुळे काही भागात पूल कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पावसाचा वाढता जोर पाहता स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी शहरातही पावसाची संततधार सुरुच आहे. चांदेराई परिसरात पुराचं पाणी चढल्यामुळे काल ही बाजारपेठ रिकामी करावी लागली आहे.
वशिष्ठी आणि नारिंगी नद्यांच्या जलपातळीत वाढ झाल्यामुळे या दोन्ही शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे.
मारुती यंदा पहिल्यांदाच बुडाला आहे.
पुराची ओळख म्हणून समजला जाणारा दूतोंडया मारुती बुडाला आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळं सध्या गंगापूर धरणातून 3 हजार 647, दारणा धरणातून 11 हजार 688, नांदुर मध्यमेश्वर- 10 हजार 925 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
नद्यांच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली असून नाशकात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.
मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत.
गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे.
नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे.