गेल्या 24 तासात मराठवाड्यात पावसाचा कहर
एबीपी माझा वेब टीम | 01 Oct 2016 06:18 PM (IST)
1
तिकडे बीडमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. घाटनांदूर परिसरात काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे.
2
जळकोट तालुक्याला त्याचा फटका बसला आहे. बोरगाव खुर्द गावातील मंदिरात पाणी आलं आहे. तर औरादमध्येही पावसाचा जोर कायम आहे. मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत, मांजराकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
3
लातूर जिल्ह्यात रेणापूर, जळकोट, उदगीर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातल्या ओढे आणि नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
4
परतीच्या पावसानं चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात आज पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. काल रात्रीपासून मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. यामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.