मराठवाड्यात मुसळधार पाऊस!
आज पहाटे पाच वाजेपासून मात्र मुसळधार पाऊस बरसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. संपूर्ण पावसाळ्यात मोठा पाऊस न झाल्यामुळं येथील पाणी साठे कोरडे आहेत.
या पावसानं बळीराजा सुखावला आहे. शेवटच्या टप्प्यातील पिकांना या पावसानं जीवदान मिळालं आहे.
लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेडमध्ये पावसाच्या सरी बरसत असून बीडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.
महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर मराठवाड्यात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. कालपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसतो आहे.
रात्री 2 वाजेपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच तुळजापूरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान ईट परिसरात बारा तासात तब्बल 106 मिमी पावसाची नोंदा झाली आहे.
उस्मानाबादेत 72 तासात तब्बल 85 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. आज पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काल पहाटेपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली होती. रात्री उशीरा रिमझिम पावसाला सुरुवाता झाली. त्यानंतर आज पहाटे पाच वाजेपासून मात्र मुसळधार पाऊस बरसत आहे.
जोरदार पावासाच्या सरी, नदी नाले तुडंब
पावसाची जोरदार हजेरी