हरमनप्रीतचा असा विश्वविक्रम, जो अजून पुरुषांच्या क्रिकेटमध्येही नाही
नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा ठोकणारी हरमनप्रीत पहिलीच भारतीय फलंदाज ठरली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वी नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने 2000 साली 141 धावांची खेळी केली होती.
नॉक आऊट सामन्यात सर्वाधिक धावा (171 )ठोकण्याचा विक्रम हरमनप्रीतने केला. महिला आणि पुरुष क्रिकेटमधील हा विक्रम आहे.
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये हरमनप्रीतच्या या तुफान खेळीने अनेक विक्रम मोडित काढले.
कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव करून, इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. या उपांत्य सामन्यात नाबाद 171 धावांची खेळी करणारी हरमनप्रीत कौर भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासोबतच भारतीय महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये भारताला सामना इंग्लंडशी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -