अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या कारला अपघात, थोडक्यात बचावली

दिव्यांका त्रिपाठी स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका 'ये है मोहब्बते'मध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिव्यांकाच्या कुटुंबीयांनी यासाठी देवाचे आभार मानले आहेत.

दिव्यांका म्हणाली की, 'ड्रायव्हरला डुलका आल्यानं त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. कार डिव्हायडर तोडून खाली पडली. सुदैवानं समोर कोणती गाडी नव्हती. तसंच सूरतमधील रस्ते अतिशय चांगले असल्यानं एक मोठी दुर्घटना टळली.'
एका वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, दिव्यांकाने आपलं नशीब बलवत्तर म्हणून आपण वाचलो असल्याचं म्हटंल आहे. 'मी एका गरबा इव्हेंटला सूरतला गेली होती. राभी आम्ही खासगी गाडीनं मुंबईला परतत होतो. अचानक कारमध्ये मला जोरदार झटका लागला. मला काही समजणार त्याआधीच आमची कार किमान सहा फूट खोल एका शेतात पडली होती.'
छोटया पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी कार अपघातात थोडक्यात बचावली आहे. सूरतहून एक गरबा इव्हेंटमधून मुंबईला ती परतत होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -