✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह तुफान पाऊस

एबीपी माझा वेब टीम   |  11 Feb 2018 04:16 PM (IST)
1

अकोला जिल्ह्यातील बाळापूर, तेल्हारा, अकोट तालुक्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. यामध्ये कांदा, गहू, हरभरा पिकाचं नुकसान झाल्याची शक्यता आहे.

2

बुलडाण्यातील चिखली तालुक्यात गारांचा पाऊस झाला असून वादळी वारा सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हरभरा, कांदा, गहू पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

3

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वाकद, महागाव, बेलखेड परिसरात गारपीट झाली.

4

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातही गारांचा पाऊस झाला. लिंबाच्या आकाराइतक्या गारा पडल्याचं स्थानिक सांगतात. धुळे शहर परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

5

जालन्यात जवळपास 15 मिनिटं गारपिटीचा मोठा मारा झाला. त्यामुळे गारांचा अक्षरश: खच पडल्याचं चित्र बघायला मिळालं. जालना शहरासह अंबड, मंठा तालुक्यातही गारांसह पाऊस झाला. जालन्यात तर सध्या रस्त्यावर गारांचा पांढराशुभ्र खच पडल्याचं चित्र दिसत आहे.

6

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. जालना, बीड, वाशिम, अकोला, बुलडाण्यात गारपीटीसह पाऊस झाला.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मराठवाड्यासह विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह तुफान पाऊस
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.