बॉलिवूड, राजकारणानंतर ही अभिनेत्री थेट पायलट बनली !
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 12:13 PM (IST)
1
इतर पायलट्ससोबत गुल पनागचा ग्रुप फोटो
2
पल्लब दास हा एविएशन इंजिनिअर असून त्यानं भोपाळ ते गुनापर्यंत उड्डाणात गुल पनागला साथ दिली.
3
गुल पनागचा आनंद गगनात मावत नव्हता.
4
गुल पनाग
5
'मी सर्व परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. एक विमान उडविण्याच्या सर्व आवश्यक गोष्टी पास केल्या आहेत. माझ्याकडे आता विमान उडविण्याचं तांत्रिक ज्ञान आहे.' हा परवाना मिळविल्यानं गुल पनाग खूपच खुश दिसत होती.
6
खुद्द गुल पनागनं याची माहिती आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिली आहे. इंस्टाग्रामवर आपले हे फोटो शेअर केले आहेत.
7
मॉडेलिंग, बॉलिवूड, राजकारण यानंतर अभिनेत्री गुल पनाग आता थेट पायलट झाली आहे. कोणत्या सिनेमाच्या शुटींगसाठी नाही तर गुल पनागला खरोखरच विमान उडविण्याचं परवाना मिळाला आहे. त्यामुळे ती आता खासगी विमान उडवू शकते.