गुजरात ओपिनियन पोल : कोणाला किती जागा मिळणार?
जीएसटीवर देखील बरेच व्यापारी नाराज आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुजरात विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्याआधी गुजरातमधील जनतेचा मूड काय आहे, हे ‘सीएसडीएस’ आणि ‘एबीपी न्यूज’ने जाणून घेतले. कच्छ, सौराष्ट्र, दक्षिण गुजरात, उत्तर गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये कोणता पक्ष बाजी मारेल, कोण मॅजिक फिगर पार करेल, हे या ओपिनियन पोलमधून जाणून घेता येणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्याआधी सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने ओपिनियन पोल घेतला, त्यात गुजरातमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार असल्याचे दिसून येते आहे. ओपिनियन पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपला 95, काँग्रेसला 82, तर इतरांना 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
ओपिनियन पोलनुसार, उत्तर गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. इथं भाजपला 41 टक्के मतं तर काँग्रेसला तब्बल 56 टक्के मतं मिळू शकतात.
गुजरातमधील काही भागात तर भाजपला बराच फटका बसेल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर गुजरातमधील काही भागात भाजपपेक्षा काँग्रेसला अधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे.
गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचारला आता चांगलाच जोर चढला आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी तर भाजपकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 50 विधानसभा मतदारसंघातील 200 बुथवर जाऊन 3 हजार 655 लोकांची मतं जाणून घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -