Gudhipadva Special : रूप सावळे सुंदर... चाफ्याच्या फुलांत सजला पांडुरंग
देवाच्या प्रसन्नतेतून मानवजातीवरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे ही भावना प्रत्येकाच्या मनात नक्कीच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस असल्याने विठुरायाच्या गाभाऱ्यात सोनचाफा, मोगरा आणि इतर सुगंधी फुलं, पानांची सजावट करण्यात आली आहे.
मागील तीन वर्षापासून विविध उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आणि फळांची आकर्षक सजावट करण्यात येते. परंतु 17 मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन बंद करण्यात आले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे पंढरपूरचं विठ्ठल मंदीर बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे.
मंदीर बंद असूनही परंपरा म्हणून मंदिर समितीने मिळेल त्या फुलांमध्ये विठ्ठल आणि रूक्मिणीचा गाभारा कर्मचाऱ्यांकडून सजवून घेतला आहे.
विठुरायासोबतच रुक्मिणी मातेचा गाभाराही पानाफुलांनी सजवण्यात आला आहे.
अशातच सर्वत्र कोरोनाची दहशत असल्याने विठुरायाचा पाडवा देखील बंद मंदिरातच साजरा होत आहे.
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असतानाच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बहुतांश मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -