27 वर्षानंतर मध्य रेल्वेची 'राजधानी एक्सप्रेस' धावली, थाटात स्वागत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजधानी एक्सप्रेसमध्ये वर्च्युअल 3डी ग्राफीक वायफायद्वारे आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार असून, त्याचाही प्रारंभ यावेळी करण्यात आला.
जास्तीत जास्त प्रवाशांना आता दिल्लीचा प्रवास सुकर होणार आहे. एका दिवसात 100 टक्के ट्रेन आरक्षित झाली.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहता मुंबई-दिल्ली फेऱ्या वाढविण्याचा विचार करण्यात येईल असे गोयल म्हणाले.
या ट्रेनचे नागरिकांनी जागोजागी थाटात स्वागत केले.
19 तास 30 मिनिटांत दिल्ली गाठणारी ट्रेन कल्याण-नाशिक-जळगाव-भोपाळ-झाशी या मार्गाने जाणार आहे.
27 वर्षानंतर राजधानी एक्सप्रेस सुरू होत असून, मध्य रेल्वेच्या सेवेतून पहिली राजधानी एक्सप्रेस सुरू होणे ही रेल्वे प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले.
या निमित्ताने 'राजधानी एक्सप्रेस' फुलांनी सजविण्यात आली होती.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. या ट्रेनचे नागरिकांनी जागोजागी थाटात स्वागत केले.
मध्य रेल्वेची पहिली 'राजधानी एक्सप्रेस' चा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -