रुममध्ये घुसून गर्लफ्रेंडसमोरच पैलवानाची खलीकडून धुलाई!
हे तेच रेसलर आहेत ज्यांनी आठ महिन्यांपूर्वी खलीला बरीच मारहाण केली होती. ज्यामुळे खलीला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं.
त्यानंतर झालेल्या सामन्यात 10 हजार प्रेक्षकांच्या समोर खलीनं परदेशी पैलवान ब्रोडी स्टील, माइक नोक्स आणि रोब्स राणा यांची यथेच्छ धुलाई केली.
या घटनेचा एका व्हिडिओ आता समोर आहे. ज्यामध्ये खली त्यांना मारहाण करताना दिसतो आहे.
यावेळी रुममध्ये असलेली महिला रेसलर बरीच घाबरली होती. ती खली मारहाण करु नये यासाठी विनवणी करीत होती.
या रेलरर्सने खलीच्या महिला विद्यार्थी आणि भावाला बरीच मारहाणही केली होती. याचाच बदला खलीनं घेतला. हंगामा करणाऱ्या अमेरिका, कॅनडा आणि द. आफ्रिकेच्या रेसलर्सला त्याने पानिपतमधील हॉटेलच्या रुममध्ये जाऊन बरीच मारहाण केली.
काही दिवसांपूर्वी हरियाणातील गुरुग्राममध्ये सीडब्ल्यूई चॅम्पियनशीपमध्ये सामने होणार होते. पण काही कारणाने सामना झाला नाही. त्यामुळे नाराज परदेशी रेसलरनं खलीच्या अकादमीची तोडफोड केली.
दिलीप सिंह उर्फ द ग्रेट खलीला आपण WWE च्या रिंगमध्ये अंडरटेकर आणि बतिस्तासारख्या रेसलरला धूळ चारताना अनेकदा पाहिलं असेल पण पानिपतमध्ये झालेल्या एका मॅचमध्ये खलीचं एक वेगळंच रुप सगळ्यांना पाहायला मिळालं आहे.