पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामंपचायत निवडणुका?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत.
फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे समोर येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होईल. तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे.
नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे चुरस वाढली आहे. विशेषत: याचा फायदा भाजपला होईल अशी अटकळ बांधली जात आहे.
गावागावात आता छुप्या रणनीतीसाठी चर्चा-बैठकांना ऊत आला आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास 3 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
राज्यभरातील 16 जिल्ह्यात उद्या (शनिवार) ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -