✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

दाऊदच्या 'या' संपत्तीचा लिलाव होणार!

एबीपी माझा वेब टीम   |  19 Oct 2017 12:45 PM (IST)
1

याआधी, पत्रकार एस बालकृष्णन यांची एनजीओ ‘देश सेवा समिती’ने हॉटेल रौनक अफरोझसाठी 4.28 कोटी रुपयांची सर्वाधिक किमतीची बोली लावली होती. 30 लाखांची अनामत रक्कम भरल्यानंतर 30 दिवसांच्या कालावधीत उर्वरित 3.98 कोटींची रक्कम भरता न आल्यामुळे ती मालमत्ता त्यांच्या हातून निसटली. यावेळी हॉटेल रौनक अफरोझसाठी अनामत रक्कम 6.28 लाखांनी घटवून 23.72 लाख रुपये करण्यात आली आहे. या मालमत्तेची बाजारातील किंमत 6 ते 8 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे.

2

याशिवाय मोहम्मद अली रोडवरील शबनम गेस्ट हाऊस, माझगावातील पर्ल हार्बर इमारतीतील एक फ्लॅट, सैफी ज्युबिली स्ट्रीटवरील दादरीवाला चाळीतील एका खोलीचे भाडेकरार अधिकार आणि औरंगाबादमधील 600 चौरस फूट फॅक्टरीचा प्लॉट या मालमत्तांचा लिलाव होईल.

3

यामध्ये भेंडी बाजार परिसरातील दमरवाला इमारतीचा समावेश आहे. या इमारतीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर राहतो. दुबईला जाण्यापूर्वी दाऊद याच परिसरात राहत असे. दाऊदची आई अमिना बी यांनी ही इमारत 1980 मध्ये विकत घेतली होती.

4

स्मगलर्स आणि परदेशी विनिमय नियंत्रक कायद्या (SAFEMA)च्या प्रशासकांनी वर्तमानपत्रात सार्वजनिक लिलावासंदर्भात जाहिरात दिली आहे. 14 नोव्हेंबर 2017 रोजी सहाही मालमत्तांचा लिलाव होणार असून बेस किंमत 5.54 कोटी रुपये असेल.

5

साधारण दोन वर्षांपूर्वी केंद्राने हॉटेल रौनक अफरोझ म्हणजेच ‘दिल्ली झायका’चा लिलाव करण्याचा प्रयत्न केला होता. आता याच हॉटेलसोबत आणखी पाच मालमत्तांचा लिलाव करण्याची घोषणा अर्थमंत्रालयाने केली आहे.

6

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. दाऊदच्या सहा मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकार करणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • दाऊदच्या 'या' संपत्तीचा लिलाव होणार!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.