खुशखबर, आता सुकन्या समृद्धी आणि PPF वर जास्त व्याज मिळणार!
याशिवाय पाच वर्षांच्या मासिक प्राप्तीकर खात्यावर 7.7 टक्के, सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीमवर 8.7 टक्के आणि 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर आता 7.3 टक्के व्याज मिळेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअधिसूचनेनुसार आता गुंतवणूकदारांना सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. याआधी सप्टेंबरपर्यंत यावर 8.1 टक्के व्याज मिळत होतं.
पब्लिक प्रोव्हिडंट फंडवर सध्या 7.6 टक्के आर्थिक व्याज मिळतं. आता हा व्याजदर वाढवून 8 टक्के करण्यात आला आहे. तसंच किसान विकास पत्रावर मिळणारं व्याज आता 7.7 टक्के झालं आहे. याआधी हा दर 7.3 टक्के होता.
NSC वरही फायदा : अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार आता गुंतवणूकदारांना नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट्स (NSC) वर 8 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी 7.6 टक्के व्याज मिळत होतं.
अर्थ मंत्रालयाने आज (20 सप्टेंबर) ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. यानुसार आता सुकन्या समृद्धी योजना, पब्लिक प्रोव्हिडंट फंडसह इतर योजनांवर जास्त व्याज मिळणार आहे.
अल्प बचतीच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने या योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या तिमाहीसाठी व्याजदरांची घोषणा केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -