पैसे नको, शब्द द्या, मोबाईल घेऊन जा, विक्रेत्यांची ऑफर
नवा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरु शकते.
जुन्या पाचशे आणि हजारच्या निर्णयानंतर स्मार्टफोन खरेदीमध्येही मोठी घट झाली आहे. चलनाच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना स्टोअर्समध्ये उपकरणं खरेदी करणं अशक्य झालं आहे.
झिरो डाऊनपेंमेंटची ही ऑफर ग्राहकांना नव्या नोटांच्या तुटवड्यानंतरही भुरळ घालणार आहे.
संगीथा मोबाईल्सचे देशभरात 300 स्टोअर्स आहेत. यापूर्वी मोबाईल घेण्यासाठी ठराविक डाऊनपेमेंट देणं गरजेचं होतं. त्यानतंर हफ्त्याच्या स्वरुपात व्याजासह पैसे द्यावे लागत होते.
बंगळुरुच्या संगीथा मोबाईल्सने ग्राहकांना खास ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार मोबाईल घेताना एक रुपयाही देण्याची गरज नाही. 12 महिने मोबाईलची किंमत हफ्त्यांमध्ये देता येणार आहे, असं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.
बाजारात चलनाचा तुटवडा पाहता विक्रेत्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मोबाईल विक्रेत्यांनी ग्राहकांना झिरो डाऊन पेमेंटवर मोबाईल विकण्यास सुरुवात केली आहे.