'गोलमाल अगेन'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
गोलमाल अगेन या सिनेमानं आतापर्यंत भारतात 165.68 कोटींची कमाई केली आहे.
तिसऱ्या दिवशी या सिनेमानं 29.09 कोटीची कमाई केली होती.
तर दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 28.37 कोटी कमवले होते.
या सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल 30.14 कोटींची कमाई केली होती.
अजय देवगन, तब्बू, तुषार कपूर, अर्शद वारसी आणि परिणीति, चोप्रा एवढी मोठी स्टार कास्ट असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 10व्या दिवशी देखील या सिनेमा चांगली कमाई केली आहे.
तर 10व्या दिवशी 12.25 कोटींची कमाई या सिनेमानं केली.
9व्या दिवशी या सिनेमानं 10.50 कोटी कमवले होते.
तर सातव्या दिवशी या सिनेमानं 9.13 कोटीची कमाई केली.
आठव्या दिवशी या सिनेमाची कमाई 7 कोटी होती.
सहाव्या दिवशी या सिनेमाची कमाई 10.5 कोटी होती.
तर पाचव्या दिवशी या सिनेमानं 13.25 कोटीचा गल्ला जमवला होता.
चौथ्या दिवशी तब्बल 16.04 कोटीची कमाई या सिनेमान केली होती.