स्विमिगं पूलमध्ये अजगर, फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2016 11:49 AM (IST)
1
कोरी वॉलेसनं लिहलं आहे की, 8 वर्षाचा हा अजगर त्यांनी बर्मावरुन आणला आहे. ज्याचं नाव सुमात्रा आहे.
2
यू ट्यूबर कोरी वॉलेसनं व्हिडिओ पोस्ट करताना लिहलं आहे की, सुमात्रा (हे पाळलेल्या अजगराचं नाव आहे) 500 पेक्षा जास्त बर्थ पार्टी आणि शाळेंमध्ये गेला आहे. हा अजगर सुरुवातीपासूनच मुलांसोबत राहिला आहे. त्याने आजवर कोणालाच नुकसान पोहचवलेलं नाही. एवढंच काय तर त्याला आमचा कुत्रा आणि मांजरही आवडतात.
3
युनाइटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या मते, हा अजगर विषारी नसतो. जगभरात एका वर्षात या अजगरच्या चावण्याने एका किंवा दोघांचा मृत्यू होतो.
4
व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये मुलांसोबत एक अजगरही पाण्यात दिसून येतो आहे. अख्खं कुटुंबच या अजगरासोबत पोहण्याचा आनंद घेत आहे.