जिओनी S6 प्रो लाँच, जबरदस्त फीचर्स
हा स्मार्टफोन भारतातही लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
यात 4जी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस यासारखे फीचर सपोर्ट करतात.
या स्मार्टफोनमध्ये 3130 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
जिओनी S6 प्रोमध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
यामध्ये 1.8ghz ऑक्टा कोअर मीडियाटेक हीलिओ P10 प्रोसेसर आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. तसेच 128 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. तसंच यामध्ये अँड्रॉईड 6.0 मार्शमेलोही अपग्रेड आहे.
हा स्मार्टफोन मेटल बॉडीमध्ये तयार करण्यात आला आहे. 5.5 इंच डिस्प्ले आणि 1080x1920 पिक्सल आहे. यासोबतच 2.5 d कर्व्ह डिस्प्ले आहे.
चीनी स्मार्टफोन कंपनी जिओनीनं आपला नवा स्मार्टफोन S6 प्रो लाँच केला आहे. याची किंमत 1,999 चीनी युआन (जवळजवळ 20,000 रु.) आहे. या स्मार्टफोनला अॅपलसारखा लूक देण्यात आला आहे. मात्र, हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच करण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.