गॅरी कर्स्टन यांच्या तोंडावर चेंडू आदळला, दात पडले!
एबीपी माझा वेब टीम | 17 Jan 2018 03:04 PM (IST)
1
दुर्घटनेनंतर तातडीने कर्स्टन यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
2
आगामी आयपीएल सीझनमध्ये गॅरी कर्स्टन आरसीबी संघाचे प्रशिक्षक असणार आहेत.
3
गॅरी कर्स्टन यांचे काही दातही पडले. शिवाय जबड्याला मोठी दुखापत झाली.
4
गॅरी कर्स्टन हे 2011 च्या विश्वकप विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
5
गॅरी कर्स्टन यांच्या तोंडावर ज्यावेळी चेंडू आदळला, त्यावेळी ते सलामी फलंदाज डार्सी शॉर्टचा सराव घेत होते. चेंडू अचानकपणे त्यांच्या चेहऱ्याच्या दिशेने आल्याने त्यांना बाजूला होता आले नाही आणि त्यामुळे दुखापत झाली.
6
ऑस्ट्रेलियात बिग बॅश टुर्नामेंटमध्ये घडलेल्या एका दुर्घटनेमुळे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना दुखापत झाली आहे.
7
बिग बॅशमधील होबार्ट हरिकेंसचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या तोंडावर सरावादरम्यान चेंडू आदळला आणि त्यामुळे दुखापत झाली.