6 चेंडूत 6 षटकार, गॅरी सोबर्स यांच्या ऐतिहासिक पराक्रमाला 48 वर्षे पूर्ण
क्रिकेटच्या इतिहासात 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रम सर्वात आधी सोबर्स यांनी केला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहर्शल गिब्ज - दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्शल गिब्जनेही एकाच षटकात 6 सिक्सर ठोकले आहेत. गिब्जने 2007 मध्येच नेदरलँडविरुद्धच्या वन डे सामन्यात 6 षटकार टोलवले होते. नेदरलँडच्या डेन वेन बंजच्या षटकात गिब्जने हा पराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 6 चेंडूत 6 षटकार ठोकणारा गिब्ज पहिला फलंदाज ठरला होता.
युवराज सिंह - रवी शास्त्रींनंतर सहा चेंडूत सहा सिक्सर ठोकणारा युवराज सिंह हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला. मात्र रवी शास्त्रींनी रणजी चषकात 6 षटकार ठोकले, पण युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय सामन्यात 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये हा पराक्रम केला होता. युवराजने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सहा सिक्सर ठोकले होते.
6 चेंडूत 6 षटकार ठोकणारे फलंदाज - रवी शास्त्री - टीम इंडियाचा माजी फलंदाज रवी शास्त्री यांनीही 6 चेंडूत 6 सिक्सर ठोकण्याचा पराक्रम गाजवला आहे. गॅरी सोबर्स यांच्या विक्रमाच्या 16 वर्षांनी रवी शास्त्रींनी हा कारनामा केला. रवी शास्त्रींनी 1984 मध्ये रणजी चषकात मुंबई आणि बडोद्यामधील सामन्यादरम्यान 6 षटकार ठोकले. बडोद्याचा फिरकीपटू तिलकराजच्या गोलंदाजीवर रवी शास्त्रींनी 6 चेंडूत 6 षटकार मारले होते.
अॅलेक्स हेल्स - नॉटिंघमशायरकडून खेळणाऱ्या अॅलेक्स हेल्सने नॅटवेस्ट टी 20 ब्लास्ट टुर्नामेंटमध्ये वॉर्विकसायरविरुद्ध सहा चेंडूत 6 षटकार ठोकले. मात्र हे एकाच षटकात नव्हते. हेल्सने आधी बॉयड रेंकिनच्या ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूवर, तर अतीक जावेदच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत, सलग सहा चेंडूत सहा सिक्सर ठोकले होते.
नॉटिंघमशायरचे कर्णधार म्हणून खेळताना सॉबर्स यांनी ग्लेमॉर्गन विरुद्ध मॅल्कम नॅशच्या गोलंदाजीवर 6 उत्तुंग षटकार ठोकले होते.
आजच्याच दिवशी म्हणजे 31 ऑगस्ट 1968 रोजी गॅरी सोबर्स यांनी एकाच षटकात 6 षटकार ठोकले होते. सोबर्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हा कारनामा केला होता.
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंहने 2007 च्या टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये ठोकलेले सलग 6 षटकार आजही कोणी विसरलेला नाही. मात्र एकाच षटकात 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम सर्वात आधी वेस्ट इंडिजचे महान फलंदाज सर गॅरी सोबर्स यांनी केला होता. सोबर्स यांनी केलेल्या या पराक्रमाला आज 48 वर्ष पूर्ण झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -