गणरायाच्या आगमनाची मूर्तीकारांमध्ये लगबग
त्याचबरोबर नारळ आणि सुपारीचा गणपती, आणि शंखांचा गणपती हे सर्वांचे विशेष आकर्षण दिसून येत आहे.
या वर्षी येथे नुकताच प्रदर्शित झालेल्या, बाजीराव मस्तानी या चित्रपटातील बाजीराव पेशव्यांच्या रुपातील गणपतींची मोठी मागणी दिसत आहे.
सध्या गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तीकारांमध्ये मोठी लगबग सुरु आहे. हजारो कारागीर गणेश मूर्तीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत.
दरवर्षी या भागातून लाखो गणेशमूर्ती विक्रीसाठी इतत्र पाठवल्या जातात.
आता गणपती आगमनाला काही दिवस शिल्लक असल्याने एबीपी माझाच्या दर्शकांसाठी काही निवडक गणपती.
आकर्षक रंगांनी रंगवलेले गणपती पाहण्यासाठी तसेच गणपतींच्या नोंदणीसाठीही गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.
दरवर्षीच येथे गणरायाच्या विविध रुपातील गणपती साकारले जातात. गेल्यावर्षी येथे जय मल्हार या मालिकेतील खंडेरायाच्या रुपातील गणपतींची मोठी मागणी होती.
भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवासोबतच माघी गणपतीसाठीही येथे गणेश निर्मिती केली जाते. त्यामुळे हजारो कुटुंबीयांचा गणेश निर्मितीचा बारा महिन्यांचा व्यवसाय बनला आहे.
संपूर्ण जगात पेण हे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवे या गावातील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह गणेशमूर्तीच्या निर्मितीवर चालतो.
गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे संपर्ण जगाला आकर्षण असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापुरात सध्या गणेश मूर्तीकारांमध्ये मोठी लगबग सुरू आहे.