मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गणेशोत्सव
श्री मूर्ती वाजत-गाजत आणून तिची मिलिटरी महादेव मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. नंतर ब्रिगेडियर गोविंद कलवड आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्री चे विधिवत पूजन करण्यात आले.
अधिकारी वर्गाने देखील झांज पथकात सहभागी झाला होता. मिलिटरी बँड श्री मूर्तीच्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. अधिकारी आणि जवान त्यांचे कुटुंबीय देखील उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना सेंटरचे कमांडन्ट ब्रिगेडियर गोविंद कलवड यांच्या हस्ते करण्यात आली.
मराठा सेन्टरमधील पी टी शेडपासून श्री मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत झांज पथक, मिलिटरी बँड, लेझीम पथक अग्रभागी आपली कला सादर करत होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा सेंटरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. अधिकारी, जवान सगळे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात.
देशाच्या रक्षणासाठी सज्ज असणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे अधिकारी आणि जवान गणेशोत्सवानिमित्त झांज पथक, लेझीम पथकात सहभागी होऊन गणेशभक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. (सर्व फोटो - विलास अध्यापक, एबीपी माझा, बेळगाव)