देवाला साकारणारा देवमाणूस देवाघरी
गेल्या 40 वर्षांत त्यांनी 250 पेक्षा जास्त 25 फुटांहून जास्त उंचीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिकमधील भाविकांकडे त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपर्यावरण विषयक जागृतीमुळे खातू यांनी लालबाग-परळमधील कारखान्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसला पर्याय म्हणून शाडूच्या मातींची निवड केली.
चंदनवाडी, खेतवाडी, तुलसीवाडी, चिराबाझार, गणेशगल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, वसईचा महाराजा यासारख्या गणेशमूर्ती खातू तयार करत.
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर आला असल्यामुळे खातू यांच्या कारखान्यात गणेशमूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं होतं.
वडील रामकृष्ण खातू यांच्याकडून विजय खातूंनी गणेशमूर्ती साकारण्याचा वसा घेतला.
खातू यांनी साकारलेल्या गणेशमूर्ती फक्त महाराष्ट्रच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहेत. खातू यांचा मुंबईत परेल वर्कशॉपजवळ गणपती मूर्तींचा कारखाना आहे.
प्रसिद्ध मूर्तीकार विजय खातू यांचं वयाच्या 63 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -