राजकीय नेत्यांच्या घरीही अवतरले गणराज, नेते बाप्पाचरणी लीन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर स्थित निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले.
उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले.
शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी वांद्रे मंडळाच्या गणेशाची पूजा केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मालवणमधील निवासस्थानी गणरायाचे मोठ्या दिमाखात आगमन झाले.
सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही गणरायाचे स्वागत केले.
मंत्री एकनाथ शिंदे यांनीही गणरायाचे स्वागत केले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन झाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायांचे आगमन झाले. यावेळी विधीवत पूजा करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरी देखील बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.