बाप्पासाठी जितेंद्र यांची जुन्या घरी धाव, गिरगावात जाऊन दर्शन
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2018 03:13 PM (IST)
1
गिरगावकरांनी जितेंद्र यांना गेल्यावर्षी खास मानपत्र देऊन गौरवलं होतं. या मानपत्रात जितेंद्र यांच्या चित्रपटातील नावांची गुंफण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.
2
जितेंद्र यांना गिरगावातील श्याम सदन म्हणजे पूर्वीची रामचंद्र बिल्डिंग सोडून पन्नासहून अधिक वर्ष झाली. तरीही ते दरवर्षी गणेशोत्सवासाठी नियमित हजेरी लावतात.
3
मुंबईः बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र उर्फ रवी कपूर यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या जुन्या घरी अर्थात गिरगावातील श्याम सदनमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेतलं.
4
अवघं जग फिरलो, मात्र श्याम सदनमधील चार भींतींनी जे प्रेम दिलं ते कुठेही मिळालं नाही, अशा भावूक आठवणी जितेंद्र यांनी जागवल्या होत्या.
5