अक्षय कुमार ते आलिया भट्टपर्यंत या कलाकारांकडे भारताचे नागरिकत्व नाही
कैटरीना कैफ (Katrina Kaif) - अभिनेत्री कतरिना कैफचे वडील काश्मिरी आणि आई ख्रिश्चन आहेत. पण तरीही कतरिनाकडे भारतीय नागरिकत्व नाही. तसेच ती भारतात मतदान करू शकत नाही. कॅटरिनाचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी लियोनी (Sunny Leone) - बॉलिवूड अभिनेत्री सनीचा जन्म भलेही भारतात झाला असेल पण तिच्याकडे भारताचे नागरिकत्व नाही. तिच्याकडे अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांचे दुहेरी नागरिकत्व आहे. जरी ती पती डॅनियल आणि दोन्ही मुलांसमवेत भारतात राहत असली तरी परदेशातही त्यांची घरे आहेत.
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) - आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोणकडेही भारतीय नागरिकत्व नाही. त्याऐवजी तिच्याकडे डेन्मार्कचे नागरिकत्व आहे. कारण तिचा जन्म डेन्मार्कमध्ये झाला होता. तिचा पासपोर्टही तिथलाच आहे.
आलिया भट्ट (Alia Bhatt) - हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आलिया भट्टही कागदोपत्री भारताची नागरिक नाही. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. तिच्याकडे ब्रिटनचा पासपोर्टही आहे. यामागील कारण म्हणजे आलिया भट्टची आई सोनी रझदान ही ब्रिटनची आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) - अक्षयला या इंडस्ट्रीत येऊन जवळपास 3 दशक झाली आहेत. पण सध्या तो भारताचा नागरिक नाही आणि म्हणूनच तो मतदान करत नाही. अक्षयकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे, जे त्याला विंडसर विद्यापीठाने सन्मान म्हणून दिले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -