बॉलिवूड स्टार्स, ज्यांच्या मैत्रीची उदाहरणं दिली जातात

अजय देवगण आणि रोहित शेट्टी : अजय आणि रोहितची गेल्या 25 वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. या दोघांनी गोलमाल, गोलमाल रिटर्न, गोलमाल 3, बोल बच्चन आणि सिंघम यासारख्या अनेक हिट सिनेमांत एकत्र काम केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह : बॉलीवूडमधील दोन तरुण चेहरे रणवीर आणि अर्जुन आपल्या कामामुळे सतत चर्चेत असतात. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात या दोघांनी आपल्या मैत्रीबाबत भाष्य केलं आहे.

कतरिना कैफ आणि आलिया भट्ट : कतरिना आणि आलियाच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण रणवीर कपूरसोबतच्या रिलेशनमुळे या दोघींच्या मैत्रीत अडथळा येईल, असं बोललं जात होतं. मात्र कतरिना आणि आलियाने या चर्चांना चुकीचं ठरवलं.
करीना कपूर खान आणि अमृता अरोरा : बॉलिवूडमधील स्पर्धेमुळे दोन अभिनेत्रींमध्ये अनेकदा सख्य असलेलं दिसत नाही. पण करीना आणि अमृता याला अपवाद आहेत.
सलमान खान आणि आमिर खान : बॉलिवूडचे दोन मोठे स्टार म्हणजे सलमान आणि आमिर. एक अॅक्शन तर दुसरा परफेक्शनसाठी ओळखला जातो. या दोघांची मैत्रीही जगजाहीर आहे.
शाहरुख खान आणि काजोल : रील लाईफपासून रिअल लाईफपर्यंत शाहरुख आणि काजोलची मैत्री बॉलिवूडमधील सर्वात घट्ट मैत्री म्हणून ओळखली जाते. या दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. सिनेमातील या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना अक्षरश: वेड लावत होती.
जगभर आज मोठ्या उत्साहात फ्रेंडशिप डे साजरा केला जात आहे. ‘ही दोस्ती तुटायची नाय,’ असं म्हणत प्रत्येकजण आपल्या जीवाभावाच्या मित्रांना शुभेच्छा देत आहे. भारतीय सिनेमाचं मुख्य केंद्र बॉलिवूडमध्येही मैत्रीचे अनेक अध्याय पाहायला मिळाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -