FIFA 2018 : 20 वर्षांनंतर फ्रान्सनं रचला इतिहास, दुसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं
फ्रान्सचे विद्यमान प्रशिक्षक डिडियर डेशॉ यांच्याच नेतृत्त्वाखाली फ्रान्सने 1998 सालचा विश्वचषक जिंकला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफ्रान्सचा एमबापे यंग प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप पुरस्काराचा मानकरी ठरला. तर क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिड गोल्डन बॉल पुरस्काराचा मानकरी ठरला.
बेल्जियमचा गोलकीपर थिबाउट कुर्टियोसला गोल्डन ग्लोव्ह्जचा मानकरी ठरला आहे.
इंग्लंड फिफा वर्ल्डकपमध्ये चौथ्या स्थानावर राहिली. मात्र इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने स्पर्धेत सर्वाधिक गोल करत गोल्डन बूटवर आपलं नाव कोरलं.
69व्या मिनिटाला मेनजुकीचने कोल करत क्रोएशियाला दिलासा दिला मात्र त्यानंतर फ्रान्सने क्रोएशिला गोल करण्याची संधी दिली नाही.
दुसऱ्या हाफमध्ये पॉल पोग्बाने 59व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला 3-1ची मजबूत आघाडी मिळवून दिली. त्यानतंर अवघ्या सहा मिनिटात कीलियन एमबाप्पेने आणखी एक गोल करत फ्रान्सला 4-1ची आघाडी मिळवून दिली.
इवान पेरीसिचने 28व्या मिनिटाला गोल करत क्रोएशियाला 1-1च्या बरोबरीत आणलं. त्यानंतर 38व्या मिनिटाला ग्रीजमॅनने गोल करत पुन्हा फ्रान्सला 2-1ची आघाडी मिळवून दिली.
कालच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाच्या मारियो मांजुकिकने पहिला ओन गोल केला होता. या गोलनंतर फ्रान्सने सामन्यात आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. या वर्ल्डकपमधील हा 12वा ओन गोल होता.
फ्रान्सने दुसऱ्यांदा फिफा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. याआधी 1998मध्ये फ्रान्स पहिल्यांदा विश्व विजेता बनला होता.
सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2ने पराभव करत जेतेपदावर आपलं नाव कोरलं.
फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात रशियातील लुज्निकी स्टेडियममध्ये काल फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगला. ( सर्व फोटो: FIFA.COM)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -