✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

डॅशिंग हिमांशू रॉय यांचा अल्पपरिचय

एबीपी माझा वेब टीम Updated at: 11 May 2018 03:45 PM (IST)
1

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
Continues below advertisement
2

3

Continues below advertisement
4

5

6

7

8

अनेक जण हिहिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केलं होतं. तर एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणं हाताळली. यात जे डे हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश होता.मांशू रॉय यांच्याकडे फिटनेस टिप्स घेत असत. साखर खाणं बंद, तसंच गोड पदार्थ, गोडाचा चहा, साखर असलेली पेयं बंद केली, हे आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ते सगळ्यांना सांगत.

9

पिळदार शरीरयष्टी असलेल्या हिमांशू रॉय यांची प्रकृती कॅन्सरमुळे खालावली होती. अशा परिस्थितीती आपल्याला कोणी पाहू नये, असं त्यांना वाटत होतं. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. कॅन्सरवर मात करुन पुन्हा वर्दीमध्ये ड्यूटी जॉईन करण्याची त्यांची इच्छा होती. परंतु याचदरम्यान, त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्याच डिप्रेशनमधून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

10

मुंबई तसंच परदेशात त्यांनी कॅन्सरचे उपचार केले. त्यांच्या अखेरचे उपचार पुण्यात सुरु होते. उपचारानंतर फिट झाल्याचं वाटल्याने त्यांनी पुन्हा जीम जॉईन केली. परंतु कॅन्सरने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे त्यांना नैराश्येने ग्रासलं. त्यामुळे आजारपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जात आहे.

11

हॉर्स रायडिंग करताना ते पडले, त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत बरी होत नसल्याने त्यांनी अधिक तपासण्या केल्या. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला. त्यांनी कॅन्सरसंबंधित तपासणी केली असता, त्यांना बोन मॅरो कॅन्सर असल्याचं उघड झालं.

12

हिमांशू रॉय यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून तोंडात गोळी मारुन आत्महत्या केली. तोंडातून गोळी आरपार झाल्यामुळे, त्यांच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

13

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आयुष्य संपवलं. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिमांशू रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. डॅशिंग आयपीएस आणि सरळमार्गी अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • डॅशिंग हिमांशू रॉय यांचा अल्पपरिचय
Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.