अंधेरी स्टेशनवर फुटपाथ कोसळला, वाहतूक ठप्प, दोन जण जखमी
कोसळलेला पूल नेमका रेल्वेचा होता, की मुंबई महापालिकेने बांधलेला होता, याची माहिती आता घेतली जाणार आहे. सध्या तरी रेल्वेकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. पुलाचा भाग बाजूला करण्यासाठी पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
पुलाचं कोसळलेला भाग बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबाबत अजून माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेचं काही प्रमाणात नुकसान झालं असल्याचीही शक्यता आहे.
रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे बोरीवलीहून चर्चगेटकडे आणि चर्चगेटहून बोरीवलीकडे या दोन्ही बाजूची रेल्वे सेवा सध्या बंद आहे. प्रवाशांना भर पावसात पायी जावं लागत आहे. सकाळी सात वाजून 35 मिनिटांनी ही घटना घडली.
ब्रिज कोसळल्याने जीवितहानी झालेली नाही. दोघे जखमी झालेले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे वाहतूक सुरु करणं हे मोठं आव्हान आहे.
ब्रिज कोसळल्याने मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला आहे. पावसामुळे हा ढिगारा काढणं मोठं जिकीरीचं काम आहे.
ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या.
फलाट क्रमांक 8 आणि 9 यांच्यामधील हा ब्रिज होता. तो कोसळला. हा पूल खूपच जीर्ण झाला होता, त्याला लोखंडाचा सपोर्ट दिला होता. मात्र आज सकाळी साडेसातच्या सुमारास तोही कोसळला.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले ब्रिज आहे. पुलाच्या बाजूचा फुटपाथ कोसळला आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मुंबई : संततधार पावसाचा मुंबईतील लोकल रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले एंडच्या बाजूने प्लॅटफॉर्म क्र. 8 आणि 9 च्या दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही दिशेची वाहतूक सध्या ठप्प आहे.