PHOTO : मुंबईत फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी
एका दगडाला धडकल्यामुळे क्रूझचा खालचा भाग फुटला. त्यामुळे पाणी वेगाने आत शिरायला लागलं. पाणी आत जाऊन क्रूझ एका बाजूला कलंडली.
क्रूझचे कॅप्टन इरफान इस्माईल शिरगावकर यांनी 13 कामगारांना लाईफ बोटीच्या सहाय्याने सुखरुप किनाऱ्यावर आणलं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हायटाईडमुळे वांद्रे जेट्टीला लागलेला अँकर निसटला आणि क्रूझ समुद्राच्या आत वाहत गेली.
मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक जवळ एआरके डेक बार (MV AV IOR) हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट होतं. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास समुद्राचं पाणी क्रूझच्या आत शिरलं.
नजीकच्या काळात अशा दुर्दैवी अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा बाळगळण्याची गरज व्यक्त होत आहे.
सुदैवाने क्रूझवरील कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईतील समुद्रात फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी मिळाली.