✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

बर्थडे स्पेशल : एकता कपूरशी संबंधित 5 रंजक गोष्टी

एबीपी माझा वेब टीम   |  07 Jun 2017 01:03 PM (IST)
1

मालिका, सिनेमा यांनंतर डिजिटल माध्यमांकडेही एकताने अत्यंत गांभिर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. एटीएल बालाजी नावाचं अॅप लॉन्च करत तरुणांना लक्ष्य केलं आहे आणि त्यादृष्टीने प्रोग्राम बनवण्यास सुरुवात केली आहे. इथेही तिला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

2

एकता कपूरने आतापर्यंत 40 हून अधिक मालिकांची निर्मिती केली आहे. शिवाय, सिनेनिर्मितीमध्येही एकताने पाऊल ठेवलं. मालिकांच्या टीआरपी लिस्टमध्ये एकताच्या मालिका कायमच अव्वल स्थानी राहिल्या.लव्ह, सेक्स और धोखा, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, शोर इ द सिटी, रागिनी एमएमएस आणि द डर्टी पिक्चर्स यांसारख्या सिनेमांनी यश मिळवलं. तर काही सिनेमे पूर्ण फ्लॉपही झाले.

3

एकता कपूरने आपलं शालेय शिक्षण माहिममधील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर मिठीबाई कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. एकता अॅनिमल लव्हर आहेत. अध्यात्माची ओढ असलेल्या एकताला न्यूमरोलॉजीचीही आवड आहे.

4

प्राची देसाई, रोनित रॉय यांसारख्या कलाकारांना पहिली संधी एकता कपूरनेच दिली. टीव्ही मालिकांमधील सर्वात महागडे अभिनेते म्हणून ओळख असलेले राम कपूर यांची ओळखही एकता कपूरच्या मालिकेतूनच झाली.

5

7 जून 1979 रोजी मुंबईत एकता कपूरचा जन्म झाला. जितेंद्र कपूर हे तिचे वडील आणि शोभा कपूर या तिच्या आई. सुपरहिट मालिकांमुळे मनोरंजन क्षेत्रात एकता कपूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली. पुढे सिनेमांची निर्मिती करुन सिनेसृष्टीतही यश मिळवलं.

6

इंडियन टेलिव्हिजन क्वीन अशी ओळख असलेल्या एकता कपूरचा आज वाढदिवस. वेगवेगळ्या कथानकांच्या मालिकांमधून कित्येकांना सिनेजगताची दारं उघडून देणारी एकता कपूर बालाजी टेलिफिल्मसची व्यवस्थापकीय सहसंचालक आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया एकता कपूर यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी…

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • बर्थडे स्पेशल : एकता कपूरशी संबंधित 5 रंजक गोष्टी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.