✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्या तरुणाने मध्येच आपत्कालीन दरवाजा उघडला

एबीपी माझा वेब टीम   |  25 Sep 2018 12:33 PM (IST)
1

अजमेर बँकेत काम करणारा हा तरुण आहे. आपण पहिल्यांदाच विमानाने प्रवास करत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचं त्याने सांगितलं. उघडलेला दरवाजा आपत्कालीन आहे हे माहित नव्हतं, अशी कबुली त्याने दिली. ज्यानंतर एका बाँडवर सही घेऊन त्याला सोडून देण्यात आलं. (फोटो : गुगल फ्री इमेज)

2

गो एअरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या जी 8 149 या विमानात हा प्रकार घडला. तरुणाने विमानाचा मागचा आपत्कालीन दरवाजा उघडला. मात्र शेजारच्या एका प्रवाशाने तातडीने अलार्म वाजवला. त्यानंतर या तरुणाला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी सीआयएसएफच्या हवाली केलं. (फोटो : गुगल फ्री इमेज)

3

या तरुणाला सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आलं आणि विमानातील 150 प्रवाशांना पुढील ठिकाणी पोहोचवण्यात आलं. मात्र आपल्याकडून चुकून हा प्रकार घडल्याचं या तरुणाने नंतर मान्य केलं. (फोटो : गुगल फ्री इमेज)

4

एका प्रवाशाने चुकून विमानाच्या आपत्कालीन दरवाजाचं लॉक उघडलं. सुदैवाने केबिनमध्ये एअर प्रेशर जास्त असल्याने दरवाजा उघडला नाही. (फोटो : गुगल फ्री इमेज)

5

दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या गो एअरच्या विमानात या तरुणाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)

6

विमानाने पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्सुकता असते, तर कधी भीती असते. अशाच एका 20 वर्षापेक्षा जास्त वयाच्या तरुणाने असा पराक्रम केला, ज्याने सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या गो एअरच्या विमानात मोठी दुर्घटना टळली. (फोटो : गुगल फ्री इमेज)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्या तरुणाने मध्येच आपत्कालीन दरवाजा उघडला
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.