द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, मनमोहन सिंहांवरील सिनेमाचा फर्स्ट लूक
मनमोहन सिंह यांच्यासारख्या व्यक्तीमत्त्वाची भूमिका साकारणं हे मोठं आव्हान आहे. जग त्यांना जवळून ओळखतं, मी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा अभ्यास करत आहे, असं अनुपम खेर म्हणाले.
या सिनेमातून विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत, तर त्यांना क्रिएटीव्ह प्रोड्युसर म्हणून हंसल मेहता यांची साथ आहे. अक्षय खन्ना या सिनेमात संजय बारु यांच्या भूमिकेत असेल. 21 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
दुसऱ्या फोटोत अनुपम खेर हुबेहूब मनमोहन सिंहांसारखेच दिसत आहेत. या फोटोत ते खुर्चीवर बसलेले आहेत.
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या तीन फोटोंमध्ये ते वेगेवगळ्या हावभावांमध्ये दिसत आहेत.
'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित सिनेमा आहे. संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. अभिनेते अनुपम खेर यामध्ये मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत दिसतील.
अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला.
तिसऱ्या फोटोत माजी पंतप्रधान हात जोडताना दिसत आहेत.