मुंबईतील वांद्रे पश्चिममधल्या झोपडपट्टीला भीषण आग
आगीत जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअतिशय अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्या असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
निर्मल झोपडपट्टीमध्ये हजारो लोक राहतात. तसंच या झोपडपट्टीत अनेक लहान उद्योग चालवले जातात.
ब्रीजवर उभं राहून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.तसंच स्थानिकही आपापल्या परीने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
लाकडी आणि बांबूच्या झोपड्या असल्याने आग वेगाने पसरली. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वीही इथे आगीची घटना घडली होती.
मुंबईतील वांद्रे पश्चिममधल्या नागरदास रोजजवळच्या निर्मल झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. आठ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग भडकली आहे. लेव्हल 4 ची ही आग असून अग्निशमन दलाच्या सुमारे 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. आज सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही भीषण आग लागली. आगीत 50 ते 60 झोपड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -