दीपिका राहात असलेल्या इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेडकडे उंच शिडीच नाही
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रभादेवीतील वीर सावरकर मार्गावरील बो मोंड इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीच्या 33 व्या मजल्याला ही आग लागली आहे.
बो मोंड इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयंही या इमारतीत आहे.
हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता.
याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे.
ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.
आगीची तीव्रता पाहून अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -