जेजुरीत मानाच्या शिखरकाठी देवभेटीचा सोहळा जल्लोषात साजरा
यावेळी मंदिर परिसरात गर्दी करुन आसलेल्या भाविकांनी एकच जल्लोष केला. वाद्यांचा गजर, भंडाऱ्यांची उधळण करत भाविकांनी ठेका धरला होता. ( फोटो सौजन्य- मनोज शिंदे )
खंडोबाच्या मंदिराच्या शिखराला मानाच्या काठ्या टेकवल्या अन हा सोहळा पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मानाच्या काठ्यांबरोबर इतर अनेक प्रासादिक काठ्यांनी शिखर काठी यात्रेचा मान घेतला. ( फोटो सौजन्य- मनोज शिंदे )
यामध्ये संगमनेरचे होलम, बारामतीच्या सुपे येथील खैरे आणि होळकर यांच्या ऐतिहासीक काळापासूनच्या मानाच्या शिखर काठ्या आणि इतर पन्नासहून अधिक गावोगावच्या शिखर काठ्या जेजुरी गडावर येऊन देवभेट घेतात. ( फोटो सौजन्य- मनोज शिंदे )
यातील प्रत्येक यात्रेला एक वेगळी प्रथा आणि महत्व आहे. माघ पौर्णिमेच्या दूसऱ्या दिवशी खंडोबा मंदिराच्या शिखराला काठी टिकवण्याचा मानाचा कार्यक्रम असतो. ( फोटो सौजन्य- मनोज शिंदे )
जेजुरी खंडोबा हे आख्या महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. या लोकदैवताच्या वर्षाकाठी आठ यात्रा होतात. ( फोटो सौजन्य- मनोज शिंदे )