पाकिस्तानातील राजकीय नेत्या : ब्युटी विथ ब्रेन
जगभरात महिला विविध क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडत आहेत. राजकीय क्षेत्रात राहून देशाची दिशा ठरवण्यातही महिलांचं मोठं योगदान आहे. पाकिस्तानातील राजकारणात काही महिलांनी आपलं सौंदर्य आणि कामातून वेगळी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
हिना रब्बानी खार : हिना पाकिस्तानमधील सर्वात कमी वयाच्या आणि पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री आहेत. हिना यांनी जगात विविध ठिकाणी पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं आहे. हिना आपल्या हुशारीशिवाय आपल्या स्टाईल आणि सौंदर्यासाठी त्या नेहमीच चर्चेत असतात. पंजाबच्या माजी गव्हर्नर आणि मुख्यमंत्री गुलाम मुस्तफा खार हे हिना यांचे मामा आहेत.
कशमला तारिक : कशमला तारिक पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेंब्लीमध्ये पंजाब प्रांतातून महिलांच्या आरक्षित जागेवरील सदस्य आहेत. त्या पाकिस्तान मुस्लीम लीगच्या नेत्या आहेत. कशमला दोन वेळा खासदार म्हणून निवडूण आल्या आहेत. पाकिस्तानात महिलांच्या हक्कांसाठी त्या लढा देत आहेत.
हिना परवेज बट : हिना पाकिस्तानच्या सर्वात सुंदर राजकीय महिला नेत्यांपैकी एक आहेत. हिना पाकिस्तानच्या लाहोर युनिव्हर्सिटीमधून मॅनेजमेंट सायन्समधून गोल्ड मेडलिस्ट आहेत. पाकिस्तानातून कौटुंबिक हिंसा आणि बालविवाह यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी काम करत आहेत.
आयला मलिक : आयला पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती सरदार फारुख अहमद खाँ लेघारी यांच्या भाजी आणि माजी केंद्रीय मंत्री सुमैरा मलिया यांची बहीण आहे. आयला इमरान खान यांच्या तहरीक ए इंसाफ या पक्षाच्या नेत्या आहेत.
मरयम नवाज : मरयम पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आहेत. मरयम देश आणि विदेशातील विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतात. पाकिस्तानच्या राजकारणात त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली आहे.
सुमैरा मलिक : सुमैरा मलिका पकिस्तानातील प्रसिद्ध राजकीय व्यक्तीमत्व आहे. याशिवाय त्या समाजसेविका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. सुमैरा मलिक अल्ला यार खान यांची मुलगी आहे आणि कालाबाघचे नवाब आमिर मोहम्मद खान यांच्या नात आहेत. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती सरदार फारुख खान लेघारी हे सुमैरा यांचे काका आहेत.