या पाच मार्गांवर स्वस्त दरात एसटीची स्लीपर बस धावणार!
स्लीपर कोचमध्ये मिळणाऱ्या सुविधा - पूर्णतः वातानुकूलीत, मोफत वायफाय, प्रत्येकाला ब्लँकेट-पिलो, मोबाईल चार्जिंगची सुविधा, आगप्रतिबंधक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीआरएस सिस्टीम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिकीट दर 13.10 रुपये प्रति टप्पा (6 किमीचा एक टप्पा)
निगडी(पुणे)-बेळगाव (रू.797)
शहादा-पुणे (945 रुपये)
औरंगाबाद-पणजी (1417 रुपये)
पुणे-पणजी (959 रुपये)
मुंबई : एसटी महामंडळाने शिवशाही श्रेणीतील 30 बर्थ (2 by 1) असलेली शयनयान (स्लीपर कोच) बस सेवा किफायतशीर तिकीट दरात सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी पहिल्या दहा खाजगी भाडे तत्वावर असलेल्या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. राज्यातील पाच मार्गांवर या बस धावणार आहेत.
शिवशाही स्लीपर कोच मार्ग आणि भाडं - मुंबई-पणजी (1296 रुपये)
मध्यंतरी राज्यात काही ठिकाणी ठेकेदारी तत्वावर सुरू झालेल्या बस चालकाचा प्रवाशांना आलेला कटू अनुभव पाहता यात काय सुधारणा करण्यात आली, हे मात्र एसटी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
दरम्यान, ठेकेदाराचा ड्रायव्हर या बसवर असल्याने अप्रत्यक्ष एसटीत खाजगीकरणाचा घाट घालण्याचा हा प्रयत्न तर नाही ना ? असा सवाल एसटी वर्तुळातून उपस्थित होत आहे.
यामध्ये शहादा - पुणे ही स्लीपर कोच सेवा आजपासून सुरू होत आहे. यात चालक ठेकेदाराचा, तर वाहक एसटी महामंडळाचा राहणार आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेने भाडंही किफायतशीर असल्याचा दावा करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -