अमृतसरमध्ये मृत्यूचं तांडव, 61 जणांचे जीव घेणाऱ्या ट्रेनचे एक्स्क्लुझिव्ह फोटो
या दुर्दैवी अपघातानंतर पंजाब सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
रेल्वे प्रशासन आणि सरकारच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तांनी मृत आणि जखमींच्या संख्येला दुजोरा दिला आहे. रेल्वे अपघातातील जखमींना तरणतारण, जालंधर, गुरदासपूर आणि अमृतसरमध्ये उपचार सुरु आहेत. यामध्ये अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतं
पंजाबच्या अमृतसरमध्ये दसऱ्याला भीषण अपघात झाला. अमृतसरच्या जोडा फाटक परिसरात रावण दहन पाहणाऱ्या लोकांना ट्रेनने उडवलं. हे लोक ट्रॅकवर रावण दहन पाहत असताना तिथे डीएमयू ट्रेन त्यांच्यासाठी काळ बनून आली.
अवघ्या पाच सेकंदात चहुकडे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. अपघातातील मृतांची संख्या वाढून 61 झाली आहे तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.