बाप्पा माझा : घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक देखावे
नेपाळहून आणलेल्या जवळपास नऊ हजार रुद्राक्षांचा वापर करुन हा देखावा तयार करण्यात आला आहे. रुद्राक्षांना पॉलिश करून चकाकी देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसागर घिगे यांनी हा घरगुती इको फ्रेंडली देखावा तयार केला असून यासाठी त्यांनी पंचवीस दिवस परिश्रम घेतले. ( फोटो : सागर घिगे )
पिंपरी चिंचवडमध्ये रुद्राक्षाचे काल्पनिक मंदिर साकारण्यात आलं आहे. ( फोटो : सागर घिगे )
पणजीमधील मळा भागात युवा मंडळाने 5 हजार खडूंपासून साडे आठ फुटी गणरायाच मुर्ती साकारली आहे. मंडळाच्या देखाव्यातून हेल्मेट वापरा, पर्यावरण वाचवा, बेटी बचाव बेटी पढाव असे सामाजिक संदेश दिले आहेत.
गोव्यात कुंकळयेकर कुंटुंबियांनी नारळात गणपती साकारला आहे. माडाच्या सर्व भागांचा वापर करून बनवलेला गणपती सगळ्याच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
दरवर्षी इकोफ्रेंडली आरास तयार करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश देण्याचा तिने प्रयत्न केला आहे.
अभिनेत्री पूजा गोरे हिच्या नाशिकच्या घरी महालक्ष्मी या चक्क बुलेटवर विराजमान झाल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -