पहिल्यांदाच बाप बनणाऱ्यांनो, हे लक्षात ठेवा !
या अध्यायनाचा काही भाग अमेरिकेच्या स्टेम सेल्समध्ये प्रकाशित झाला असून त्यात कित्सलिंका म्हणाले की, मद्यप्राशन हे अपत्यावरच परिणाम करीत नसून येणाऱ्या अनेक पिढ्या यामुळे प्रभावित होतात.
या संशोधन संदर्भात माहिती देताना अमेरिकेच्या जॉर्ज टाउन विद्यापीठातील प्राध्यापक जोआन कित्सलिंका म्हणाले की, पित्याची जीवनशैली, त्याचे वय यांचा त्याच्या शुक्राणूंवर कसा प्रभाव करतात याची माहिती या संशोधनात दिली आहे.
पण संशोधनकर्त्यांनी पित्याच्या भूतकाळातील सवयीचे अध्ययन करून जे निष्कर्ष काढले आहेत ते धक्कादायक आहेत. या नुसार पित्याच्या सवयींचा त्याच्या अपत्यावर परिणाम होतो असे नमुद करण्यात आले आहे.
पहिल्यांदा बाप होणाऱ्यांना त्यांची दारू पिण्याची सवय आणि अन्य व्यसने महागात पडू शकतात. त्यांच्या या सवयींमुळे जन्माला येणारे आपत्य विकृत असू शकते. शिवाय याचा प्रभाव तुमच्या येणाऱ्या पिढीवर राहू शकतो, असा खुलासा एका नव्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
आईकडून मिळालेली पोषक द्रव्ये, हार्मान्स आणि मानसिक वातावरण यातून जन्माला येणाऱ्या आपत्याची वाढ होते, हे आपण अनेकवेळा ऐकतो.