सौंदर्य आणि पीळदार शरीराचा मिलाफ, 'मिस मुंबई' डॉ. मंजिरी भावसार
एखाद्या ध्येयाने तुम्हाला पछाडणं, ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत घेणं. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना घरच्यांचा विरोध पत्करणं आणि अखेरीस त्या ध्येयाला तुम्ही गवसणी घालणं. ही कहाणी आहे एका ध्येयवेड्या महिलेची, डॉ. मंजिरी भावसार यांची. खास महिलांसाठीच्या मॉडेल फिजीक स्पर्धेत उतरुन मंजिरी यांनी नुकताच मिस मुंबई हा किताब पटकावला.
मंजिरी लग्नानंतर मुंबईत आल्या. त्यांच्या पतीला व्यायामाची मोठी आवड. ते स्वतः शरीरसौष्ठवपटू असल्याने आपल्या बायकोनेही या क्षेत्रात येण्याची त्यांची इच्छा. मंजिरी यांनी शरिरसौष्ठव स्पर्धांना उपस्थिती लावली खरी पण बिकीनी घालून स्टेजवर जात आपल्या शरीराचं दर्शन घडवावं याला घरातून परवानगी मिळणार नाही याच्या कल्पनेनेच त्यांनी हा विचार सोडला.
आपल्या पतीने दिलेल्या प्रोत्साहनाच्या जोरावर ही स्पर्धा जिंकण्याची किमया करुन दाखवल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मंजिरी पेशाने डॉक्टर आहेत. त्यांना शौर्य नावाचा दहा वर्षांचा मुलगा आहे. आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांना भावणारी वाट निवडली.
लक्षवेधी झालेल्या या स्पर्धेत एफएसटी जिमच्या डॉ. मंजिरी भावसार यांनी हीरा सोलंकीवर मात करत आपलं पहिलंवहिलं मिस मुंबई जेतेपद पटकावलं. तर 52 वर्षांच्या निशरिन पारिख या स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
सौंदर्य आणि पीळदार शरीर यांचा मिलाफ असलेल्या महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मंजिरीने दोन वर्षांपूर्वी पाऊल टाकलं. 2017 मध्ये शेरु क्लासिक स्पर्धेत उतरल्यानंतर मंजिरी यांनी 'भारत-श्री' स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला. त्यानंतर पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं.
मग थायलंडमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला. आता 'मिस मुंबई' स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचं नाव प्रकाशझोतात आलं.
पण त्यांच्या पतीने त्यांना राजी केलं. सलग दोन अडीच वर्षांच्या व्यायामाने त्यांनी शरीर कमावलं आणि माहेरचे आणि सासरच्यांचा विरोध न जुमानता त्या स्पर्धेत सहभागी झाल्या.
कुणाचीही साथ नसताना आपण निवडलेल्या वाटेवर सर्वोत्तम कामगिरी करण्याची किमया त्यांनी केली आहे. मंजिरी यांच्या घरी अतिशय शिस्तीचं वातावरण. रात्री घराबाहेर पडणं आणि जीन्स घालण्यासही मनाई असलेल्या घरात मंजिरी मोठ्या झाल्या.
पीळदार सौंदर्यवतीच्या मिस मुंबई स्पर्धेत डॉ. मंजिरी भावसार यांनी विजेतेपद पटकावलं. गतवर्षी अवघ्या दोन स्पर्धकांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. मात्र यावेळी आरोग्य प्रतिष्ठानने अत्यंत अभूतपूर्वरित्या आयोजित केलेल्या महिलांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकाराला सात खेळाडूंचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला.